कवी इमरसन

कवी इमरसन यांच्या या सुंदर ओळी
यशस्वी जीवनाबद्दल खूप छान सांगतात,
तुम्हाला या आवडतील, पटतील असं वाटते...
(double click on image to see full screen)

CELEBRATING 60 YEARS of FREEDOM


हितागुज

फोटो आर्ट ग्रुपच्या विश्वात आपले स्वागत :
सुरूवात करण्याआधी मनात संतकवी ज्ञानदेवांची
सुपरिचित ओवी आठवतेय,
इवलेसे रोप लावियले दारी,
तयाचा वेलू गेला गगनावरि.
आपल्या मराठी भाषेचा वेलू अधिकाधीक ऊंच जावा म्हणजेच आपली भाषा, चालिरिती, विवीधता याच दर्शन व्हावं,
माणसा माणसांमधील संपर्क वाढावा, ज्ञान वाढावं, यासाठी साधारण २ वर्षांपूर्वी
आम्ही काही मित्रांनी मिळून ‘फोटो आर्ट ग्रुप’ची सुरुवात केली,
त्यामार्फत फोटो प्रदर्शन, फोटोग्राफी कार्यशाळा, अभ्यास सहल, जाणकार व
अनूभवी अशा सन्मानीय व्यक्तींचे मार्गदर्शन, असे अनेक कार्यक्रम
आयोजित केले. याचा खूप फायदा ‘फोटो आर्ट ग्रुप’मधील आपल्या मित्रांना
झाला. असाच फायदा आपल्या ईच्छूक मराठी मित्रांना व्हावा, यासाठी
संपर्क स्थळाची निर्मिती आम्ही मित्रांनी केली, जरी याचे नाव ‘फोटो आर्ट ग्रुप’
असे असले तरी हे सर्वांसाठी आहे कुणीही यावे, स्वतःला व्यक्त करावे असे
हे (इंटरनेट)चे माध्यम आहे। हा वेलू सर्वांसाठी आहे,


सहल: ‘फोटो आर्ट ग्रुप’
दिनांक: ८ जुलै २००७,
ठिकाण: कोंडेश्वर (कुंडेश्वर),
मध्य रेल्वेच्या बदलापूर या स्थानकाच्या पूर्वेला रिक्शाने १० मिनिटांच्या
अंतरावर मुंबईच्या अगदी जवळ हे नयनरम्य ठिकाण आहे, सुंदर धबधबे,
ऊंच डोंगर, प्रवाही नदी, हिरवीगार झाडं आणि त्यातून जाणारी पायवाट
आपल्याला आपल्या गावची आठवण करून देते..











.


















Counter


View My Stats